अमरावती - राज्य सरकारने पोलीस पाटील यांच्या मानधनात एप्रिल महिन्यापासून 6500 रुपये इतकी वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना एप्रिल, मे ,जून या महिन्या पर्यंतचेच मानधन मिळाले आहे. तर जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत कुठलेही मानधन त्यांना मिळालेले नाही. म्हणून अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. त्यांच्याकडून पोलीस अधीक्षक आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी थकलेले मानधन तात्काळ देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
अमरावतीत पोलीस-पाटलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; थकित मानधन मिळण्याची मागणी - collector office morcha in amravati
ऐन दिवाळीच्या सणातही थकलेले मानधन न मिळाल्याने शेकडो पोलीस पाटलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत थकलेले मानधन तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -सेनाभवनात आमदारांची बैठक; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर?
पोलीस पाटील यांची नियुक्ती ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार होत असते. समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना पोलीस पाटील होण्याची संधी असते. आजच्या काळात तरूण मुले पोलीस पाटील पदाकडे नोकरी म्हणून पाहतात. तसेच अनेक जबाबदारी सांभाळून पोलिसांना सहकार्य करतात. तर अनेक पोलीस पाटलांचा उदरनिर्वाह हा यावर अवलंबून आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या सणातही थकलेले मानधन न मिळाल्याने शेकडो पोलीस पाटलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत थकलेले मानधन तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे.