अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री ८ आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला जबाबदार धरले. त्यामुळे पोलिसांनी शिवकुमारला अटक केली आहे. पोलीस तपासात उपवनरक्षक विनोद शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचे फोन रेकॉर्ड समोर आले आहे.
चव्हाण आणि शिवकुमारचे फोन रेकॉर्ड पोलिसांच्या हाती आले आहे काय आहे प्रकरण -
मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या 2014मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली नियुक्ती मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरिसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी 'मांगीय' या गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी याबाबत विनोद शिवकुमारला माहिती दिली. मात्र, त्या खोटे बोलत असल्याचा आरोप करत दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देखील शिवकुमारने मदत केली नाही.
असा करायचा अपमानित
याशिवाय शिवकुमार रात्रीला गस्ती दरम्यान चव्हाण यांनी कुठेही बोलवून असभ्य बोलायचा. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर तो चव्हाण यांना अपमानित करायचा. शिवकुमारच्या मर्जीने वागत नसल्याने दीपाली यांचे वेतन देखील रोखण्यात आले, मानसिक छळ केला. गर्भवती असताना घरी जाण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असे विविध आरोप दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिवकुमार विरोधात केले आहेत.
हेही वाचा -अखेर वन अधिकारी दीपाली चव्हाणवर मोरगाव येथे अंत्यसंस्कार
काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये -
गर्भवती असतानाही विनोद शिवकुमार यांनी जबरदस्तीने डोंगरावर गस्तीला पाठवले. यामुळे माझा गर्भपात झाला. या दुःखासह शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मी खासदार नवनीत राणा यांच्याकडेसुद्धा तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे. याशिवाय त्यांनी अपर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डींना देखील उद्देशून काही ओळी लिहिल्या आहेत. 'सर सगळ्यांना माहिती आहे की तुमचाच विनोद शिवकुमारच्या डोक्यावर हात आहे. मी इतके लिहून सुद्धा तुम्ही त्याचे काही बिघडवू शकणार नाही, असे दिपाली चव्हाण यांनी श्रीनिवास रेड्डी यांना पत्राद्वारे म्हटले आहे.
उपवनसंरक्षक शिवकुमारला अटक -
मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. वरिष्ठांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची चिठ्ठी पोलिसांनी मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक केली. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा आरोपी आहे. तो शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावरून दिल्ली-बंगळुरू या गाडीने पळण्याच्या तयारीत होता. त्याच्या मागावर असणारे अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय व त्यांच्या चमूने लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खडसे यांच्या मदतीने शिवकुमारला अटक केली. उपवसंरक्षक विनोद शिवकुमार आत्महत्येस जबाबदार असल्याचे चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी पत्रात नमूद केल्याने धारणी पोलिसांनी शिवकुमार विरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
आई-वडीलांचे आंदोलन -
दीपाली यांच्या आईने शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. विनोद शिवकुमार याचे निलंबन करून अपर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डींची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिपाली चव्हाण यांच्याकडे राहत असलेल्या त्यांच्या आई गुरुवारी जळगावला गेल्या होत्या. त्या सायंकाळी परत येत असताना खामगावजवळ त्यांना दिपाली चव्हाण यांचा फोन आला होता. 'आई मी आता शेवटचे बोलते आहे', असे म्हणून दिपाली चव्हाण यांनी फोन ठेवला होता. यामुळे त्यांच्या आई घाबरल्या आणि त्यांनी हरिसाल येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना समजले होते.
कोण होत्या दीपाली चव्हाण -