अमरावती -जिल्ह्यात शनिवारी कडेकोट जनता कर्फ्यू असून सुद्धा धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाची सागर धरणावर हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भातील बातमी 'ईटीव्ही भारत'ने दाखवल्या नंतर या प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तसेच यानंतर धरण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पर्यटकांना येथे येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.
अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीवर बगाजी सागर धरण आहे. मागील पाच-सहा दिवसापासून जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने व अप्पर वर्धा धरणाचे काही दरवाजे उघडल्याने याही धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. अशातच १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने हजारो पर्यटकांनी जनता कर्फ्यूला पायदळी तुडवत या धरणावर गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.