अमरावती -मदरशातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैगिक शोषण करणाऱ्या संस्थाध्यक्ष मुक्ती जिया उल्ला खान व सहआरोपी शिक्षिका फिरदोसच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. पोलिसांनी या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींच्याच पोलीस कोठडीत वाढ केली.
मदरशातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : आरोपी व शिक्षिका फिरदोस कोठडीत वाढ - amravati Sexual Abuse Case
मदरशातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैगिक शोषण करणाऱ्या मुक्ती जिया उल्ला खान व सहआरोपी शिक्षिका फिरदोसच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस ठाणेदार अर्जुन ठोसरे, उपनिरिक्षक सुलभा राऊत करत आहेत.
अमरावती शहरात लालखडी परिसरात मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीवर संस्थाध्यक्ष मुक्ती जियाउल्ला खान याने तीन महिन्यापूर्वीच शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या फिरदोस जहांच्या मदतीने अत्याचार केला होता. ही खळबळजनक घटना 4 नोव्हेंबरला उघडकीस आली होती. या प्रकरणात नागपूर येथे पोलिसांनी मुक्ती जियाउल्ला खान सह फिरदोस विरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. दरम्यान मंगळवार पाच नोव्हेंबरला मुक्ती जियाउल्ला खानने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी त्याला नागपूरवरून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहआरोपी फिरोजशहा आईला शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले, यावेळी न्यायालयाने मुक्ती जियाउल्ला ला 20 नोव्हेंबर तर फिरदोसला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात आजवर शाळेतील स्टाफ सह विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले. उर्वरित विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुलभा राऊत या करत आहेत.