अमरावती- शेतकऱ्याविरोधात पोलीस ठाण्यातील दाखल तक्रार ही अदखलपात्र करण्यासाठी लाच स्वीकरणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावात ही घटना घडली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलने 1 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
सुरेंद्र बाळकृष्ण कोहरे (50) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील एका शेतकऱ्याविरुद्ध चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आली होती. दरम्यान, या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यासाठी सुरेंद्र कोहरे यांनी संबंधित शेतकऱ्याला 5 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी आपण 5 हजार रुपये आपण देऊ शकत नाही. 1 हजार रुपये देण्याची तयारी असल्याचे शेतकऱ्याने सांगितल्यावर कोहरे यांनी 1 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
हेही वाचा - धक्कादायक ! अमरावतीत पुन्हा एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार