अमरावती - नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री निश्चितपणे ( New Year Celebration At Amravati ) जल्लोष राहणार आहे. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेऊन प्रत्येकाने जरा जपून आणि समजूतदारीने नव वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Police Commissioner Navinchandra Reddy ) यांनी अमरावतीकरांना केले आहे.
असा आहे शहरात पोलीस बंदोबस्तअमरावती शहरामध्ये नवीन वर्षाच्या ( Navinchandra Reddy Appeal To People ) आगमनासाठी बंदोबस्त आहे. तो मोठ्या प्रमाणात नियोजन करून लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी निश्चितपणे ( New Year Celebration At Amravati ) यांनी दिली. सर्व पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत ते आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ तसेच सर्व अधिकारी आणि विशेष करून वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. जवळपास हजार कर्मचारी आणि 200 अधिकारी असा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय सहाय्यक आयुक्त, शहरातील दोन्ही पोलीस उपायुक्त हे सुद्धा पेट्रोलिंगमध्ये राहतील. मी स्वतः सुद्धा आजच्या परिस्थितीवर देखरेख करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष करून वाहतूकमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, ट्राफिक जॅम होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.