महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचे फटके : अमरावतीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप - संचारबंदी

संचारबंदीच्या काळात विणाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याने चांगलाच चोप दिला आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप देताना
रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप देताना

By

Published : Mar 25, 2020, 10:24 AM IST

अमरावती- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू आहे. पण, अमरावती शहरात बुधवारी (दि. 24 मार्च) दुपारी तीन वाजल्यानंतर संपूर्ण शहर शांतता होती. तरीही संचारबंदी दरम्यान विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी चांगलेच फटके दिले.

रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप देताना

शहरात बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. संचारबंदी शिथिल असताना अमरावतीकर बऱ्यापैकी बाहेर पडले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत घरी परता ,असे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. शहरातील राजकमल, राजपेठ, चित्रा चौक, गोपाल नगर, पंचवटी, गर्ल्स हायस्कुल या चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

दुपारी तीननंतर कारण नसताना दुचाकी आणि कारने बाहेर फिरायला निघालेल्या पोलिसांनी दंडुक्यांनी फटके मारले. गजबजलेल्या चित्र चौक परिसरात पोलिसांनी दंडुके हाती घेतल्यावर विनाकारणची गर्दी काही क्षणातच कमी झाली. पोलिसांच्या वतीने कोणीही अती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत होते. दुपारी चार नंतर शहरातील सर्व चौकात शुकशुकाट पसरला होता.

हेही वाचा -अमरावतीच्या परतवाड्यात देशी दारू आणि गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details