महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Car Thief Arrest : चाकात हवा भरायची सांगून पळवली कार; तेराव्या दिवशी पोलिसांनी केली अटक - Latest news from Amravati

कारसह पळालेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी चालकाला अटक (police arrested car driver for stealing car) केली व त्याने चोरुन नेलेली साडेतीन लाखांची हुंदाई कंपनीची कार जप्त (stolen car seized) केली आहे. Latest news from Amravati, Amravati Crime, Police arrested car driver

Car Thief Arrest
कार चोराला अटक

By

Published : Nov 19, 2022, 1:54 PM IST

अमरावती :कारच्या चाकांमध्ये हवा भरुन येतो, असे सांगून चालक कार घेऊन पसार (take car and run away) झाला होता. दरम्यान या प्रकरणी कार मालकाने राजापेठ पोलिसात चार दिवसांपूर्वी तक्रार (Car theft complaint filed) दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी चालकाला अटक (police arrested car driver for stealing car) केली व त्याने चोरुन नेलेली साडेतीन लाखांची हुंदाई कंपनीची कार जप्त (stolen car seized) केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) केली आहे. Latest news from Amravati, Amravati Crime, Police arrested car driver


कार मालकाने आठ दिवस पहिली वाट -नितीन दामोधरराव गंजीवाले (४७, रा. लक्ष्मी नारायणनगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. नितीन गंजीवाले हा मागील काही दिवसांपासून शहरातील हरिगंगा ऑईल मिल परिसरात राहणाऱ्या संकेत सतीश गोयंका यांच्या कारवर चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान ६ नोव्हेंबरला नितीन गंजीवालेने कार मालकाला सांगितले कि, मी कारच्या चाकांमध्ये हवा भरुन आणतो व कार घेऊन गेला. दरम्यान आठ दिवस झाले तरी तो १४ नोव्हेंबरपर्यंत कार घेऊन परत आला नव्हता. त्यामुळे संकेत गोयंका यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


बेलपुरा परिसरात केली अटक -दरम्यान पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. नितीन गंजीवाले हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास शहरातील बेलपूरा परिसरात आला असल्याची माहीती मिळताच राजापेठ पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई राजापेठचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे, डिबी पथकाचे मनिष करपे, अतुल संभे, रवि लिखीतकर, शेख दानिश, राहुल फेरन, सागर भजगवरे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details