अमरावती -शहरातील नागपुरी गेट पोलिसांनी एका कुख्यात चोराला अटक केली. या चोरट्याने शहरात 13 घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जब्बार खान रऊफ खान (वय 22 वर्षे, रा. अन्सारनगर), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण 6 लाख 38 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
असा मुद्देमाल जप्त
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने नागपुरी गेट पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपी जब्बार खानला अटक केली. त्याच्याजवळून 91 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 20 ग्रॅमची चांदी, 1 लाख 41 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण 6 लाख 38 हजार 164 मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा -अमरावतीमधील नेमाणी कॉटन जीनला आग; लाखो रुपयांचे नुकसान