महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत वेळ संपल्यानंतर मतदानाला जाण्याचा हट्ट, पोलीस आणि युवकांमध्ये वाद - पठाण चौक

शहरातील पठाण चौक येथील असोसिएशन उर्दू बॉईज स्कूल या मतदान केंद्रावर युवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली...

अमरावतीमध्ये वेळ संपल्यावर मतदानाला जाण्याचा हट्ट, पोलीस आणि युवकांमध्ये वाद

By

Published : Apr 18, 2019, 9:20 PM IST

अमरावती- शहरातील पठाण चौक येथील असोसिएशन उर्दू बॉईज स्कूल या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यावर मतदान करण्यासाठी मतदान तीन-चार महिला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना केंद्रामध्ये जाण्यास पोलिसांनी विरोध केला. त्यावेळी तेथे जमलेल्या युवकांनी त्या महिलांनी मतदानास जाऊ द्या म्हणून गोंधळ घातला. यावेळी युवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

अमरावतीमध्ये वेळ संपल्यावर मतदानाला जाण्याचा हट्ट, पोलीस आणि युवकांमध्ये वाद

पठाण चौक येथील असोसिएशन उर्दू बॉईज स्कूल या मतदान केंद्रावर दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यावर तीन-चार महिला मतदान करण्यासाठी होत्या. तेव्हा पोलिसांनी मतदानाची वेळ संपली आहे. म्हणून मतदान केंद्राचे फाटक बंद केले. त्यावेळी काही युवकांनी गोंधळ घालून फाटक उघडायला लावले. मात्र, तोपर्यंत मतदानाची वेळ संपलेली होती. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर जमलेल्या गर्दीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राखीव पोलीस पथक घटनास्थळी बोलवण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच मतदान केंद्र परिसरातील गोंधळ शांत झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details