अमरावती -अमरावती शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ( PM Narendra Modi Rangoli ) 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळी साकारण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या महत्वपूर्ण सहा योजना सुद्धा या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आल्या आहेत. अमरावती नागपूर मार्गावर असणाऱ्या मणिरत्न हॉल ( Maniratna Hall PM Modi Rangoli ) येथे अवघ्या 7 तास 7 मिनिटांत रेखाटलेल्या भव्य रांगोळीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे.
14 कलावंत, 6 टन रांगोळी -केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या कलावंत माधुरी सुधा यांच्या मार्गदर्शनात एकूण 14 कलावंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची रांगोळी रेखाटली आहे. अवघ्या 7 तास 7 मिनिटांमध्ये 11 हजार स्क्वेअर फुटात भव्य, असे रेखाटन करताना 6 टन रांगोळी वापरण्यात आली.
रांगोळीमध्ये शासनाच्या या योजनांचे रेखाटन - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रेखाटण्यात आलेल्या या भव्य रांगोळीमध्ये केंद्रशासनाच्या 'बेटी बचाव बेटी पढाव', या योजनेसह 'प्रधानमंत्री जनधन योजना', 'प्रधानमंत्री उज्वला योजना', 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना',' प्रधानमंत्री आवास योजना', 'मेक इन इंडिया', आणि 'नमामि गंगे'या योजनांचे चिन्ह या रांगोळीत रेखाटण्यात आले आहे.