अमरावती- एका 23 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या जसापूर या गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मनीष गजानन साबळे ( वय 23 ) याला अटक केली आहे.
अमरावतीमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड - Amravati latest news
पीडित मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याचे मुलीकडून आईला कळताच आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून विभागीय पोलीस अधिकारी आबादगिरे यांनी घटनेची दखल घेत आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - अमरावती : नदीच्या पुलाखाली आढळले मृत अर्भक
पीडित मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याचे मुलीकडून आईला कळताच आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून विभागीय पोलीस अधिकारी आबादगिरे यांनी घटनेची दखल घेत आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार उदयसिंह साळुके व पोलीस उपनिरीक्षक गोपाल उपाध्याय तेजस्विनी गिरसावडे यांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी चांदूर बाजार येथील देशी लाईनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.