महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत शुल्लक कारणावरून भावनेच केली भावाची हत्या - amravati crime news

शुल्लक कारणावरुन चुलत भावाने दोन मित्राच्या मदतीने भावाचीच निर्दयी हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हमालपुरा येथे आज सकाळी घडली.

person killed his brother for fee reason  in amravati
अमरावतीत शुल्लक कारणावरून भावनेच केली भावाची हत्या

By

Published : Feb 14, 2021, 4:58 PM IST

अमरावती -शहरात मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने खुणाच्या घटना वाढत आहे. आता शुल्लक कारणावरुन चुलत भावाने दोन मित्राच्या मदतीने भावाचीच निर्दयी हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हमालपुरा येथे आज सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. संतोष गजभे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

शुल्लक कारणावरून हत्या -

संतोष हा आज सकाळी आरोपी भावाकडे गेला होता. त्यावेळी त्याने भावाला दुसरी बायको का केली, असे म्हटले. त्यावरून संतोष आणि आरोपी भावामध्ये वाद झाला. वाद विकापोला गेल्याने आरोपी भावाने दोन मित्राच्या मदतीने संतोषची हत्या केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात गोड्या पाण्यातील मत्स्य क्रांतीतून तरुणांसाठी आत्मनिर्भर रोजगाराची चळवळ

ABOUT THE AUTHOR

...view details