अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या खानापूर या गावात विलगिकरण कक्षात असणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीला पुण्यात कोरोना झाला होता. त्याची दुसरी आणि तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्यावर तो पुणे येथून दोन दिवसांपूर्वीच नातेवाईक वृद्ध महिलेसह खानापूरला आल्याने त्याला वृद्ध महिलेसह जिल्हा परिषद शाळेत विलगिकरण कक्षात ठेण्यात आले होते.
पुण्यावरून परतलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा अमरावती जिल्ह्यातील खानापूर गावात मृत्यू - amravati corona patient
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या खानापूर या गावात विलगिकरण कक्षात असणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीला पुण्यात कोरोना झाला होता.
खानापूर येथील वृद्ध महिला 12 मार्च रोजी 10 वर्षाच्या नातवाला घेऊन पुण्याला भाच्याकडे गेली होती. दरम्यान, तिच्या भाच्याला 21 एप्रिलला कोरोना झाल्यामुळे या महिलेसह तिच्या नातवाला पुण्यात विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तिचा आणि नातवाच्या स्वॅब तापासण्यात आला. दरम्यान, तिच्या कोरोनाग्रस्त भाच्याची दुसऱ्या आणि तिसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर ती महिला, तिचा नातू या युवकसोबत खानापूरला आले होते.
दरम्यान, पुण्यावरून आलेल्या या महिलेला आणि तिच्या भाच्याला गावातील शाळेत विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज विलगिकरण कक्षात संबंधित व्यक्ती दगवल्याने खळबळ उडाली आहे.