महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगाव खंडेश्वरमध्ये विलगीकरण कक्षात युवकाने घेतला गळफास - नांदगाव खंडेश्वर आत्महत्या

आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास विलगीकरणात असलेल्या अजमल खान सत्तार खान या युवकाने स्वतःच्या कपड्याने गळफास घेतला. एका बाधिताच्या संपर्कात आल्याने अजमल खान याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

amravati
नांदगाव खंडेश्वरमध्ये विलगीकरण कक्षात युवकाने घेतला गळफास

By

Published : Jun 27, 2020, 2:22 PM IST

अमरावती - नांदगाव खंडेश्वर येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजमल खान सत्तार खान (२९) असे मृत युवकाचे नाव आहे.

नांदगाव खंडेश्वरमध्ये विलगीकरण कक्षात युवकाने घेतला गळफास
नांदगाव खंडेश्वर येथे २५ जूनला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. या बाधित व्यक्तींच्या संपर्कात काही जण आले होते. त्यामुळे प्रशासनाने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय वसतिगृहात त्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण केले होते. गेल्या दोन दिवसांत १६ संशयितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र, आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास विलगीकरणात असलेल्या अजमल खान सत्तार खान या युवकाने स्वतःच्या कपड्याने गळफास घेतला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. त्याचा मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचे गांभिर्य बघता उपविभागीय महसूल अधिकारी मनिष गायकवाड यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details