महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन वर्षाच्या चिमुरड्याला सोडून सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत - amravati news

तपोवन परिसरातील योगीराज नगर येथे राहणारे वायझडे दाम्पत्य आपल्या दोन वर्षीय बाळाला घरी सोडून कोरोनाग्रस्तांना सेवा देत होते. एक महिन्यानंतर ते स्वगृही परल्याने त्यांच्या परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.

corona warriors
कोरोना योद्ध्यांचे स्वागत करताना

By

Published : Jun 2, 2020, 2:56 PM IST

अमरावती- येथील तपोवन परिसरातील योगीराज नगर येथे राहणारे राहुल वायझडे व त्यांची पत्नी मीरा राहुल वायझडे या दाम्पत्याने त्यांचे दोन वर्षाचे बाळ घरी आजी-आजोबा जवळ सोडून कोव्हीड रुग्णालयात सेवा दिली. त्यानंतर ते आज आपल्या घरी परतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांंचे स्वागत केले.

कोरोना योद्ध्यांचे स्वागत करताना

वायझडे हे मागील महिनाभरापासून आपले दोन वर्षांचे बाळ घरी सोडून कोव्हीड वार्डात सेवा देत होते. त्यानंतर खबरदारी म्हणून त्या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोव्हीड वार्डात काम करुनही त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. या कोरोना योद्ध्यांचे स्वागत परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत केले. यावेळी त्यांना मिठाई भरवण्यात आली. परिसरातील नागरिकांनी केलेल्या स्वागतानंतर वायधडे दाम्पत्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करत प्रत्येक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करा, असे आवाहन केले.

हेही वाचा -पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details