महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; कुऱ्ह्यातील घरात शिरला रोही, नागरिकांची तारांबळ - रोही

कुत्रे मागे लागल्याने जंगलातील रोह्यांच्या कळप गावात शिरला. यातील एक रोही दीपक सहारे यांच्या घरात शिरल्याने सहारे कुटूंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली.

घरात शिरलेला रोही

By

Published : Jul 3, 2019, 4:59 PM IST

Updated : Jul 3, 2019, 5:21 PM IST

अमरावती- तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावातील घरात रोही शिरला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रोह्यांच्या कळपाच्या मागे कुत्रे लागल्याने हा रोही घरात शिरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

घरात शिरलेला रोही


जंगलातून गावाच्या दिशेने रोह्यांचा कळप आला होता. मात्र या रोह्यांच्या मागे गावातील कुत्रे लागले. यातच या कळपातील एक रोही लोकवस्तीतील दीपक सहारे यांच्या घरात शिरला. यावेळी घरातील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. नागरिकांनी बाहेरुन दरवाजा लावून ही माहिती चांदुर रेल्वेच्या वनविभागाला दिली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन रोह्याला तीन तासानंतर घरातून बाहेर काढून जंगलात सोडून दिले. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Last Updated : Jul 3, 2019, 5:21 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details