महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारू दुकान उघडण्यापूर्वीच तळीरामांनी लावली रांग - amravati news

अंजनगाव सुर्जी येथे आज दारू दुकाने उघडणार असल्याने येथील दुकाने उघडण्याआधीच सकाळपासून लांबलचक रांग लागली होती. तसेच शासनाने दारू दुकानदारांना घातलेल्या अटीनुसार येथील दारू दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवले आहे.

दारू दुकान उघडण्यापूर्वीच तळीरामांनी लावली रांग
दारू दुकान उघडण्यापूर्वीच तळीरामांनी लावली रांग

By

Published : May 8, 2020, 7:37 PM IST

अमरावती - संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबण्याकरिता शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दारू दुकाने सुध्दा बंद होते. त्यामुळे तळीरामांचे हे दिवस आयुष्यातील सर्वात जास्त भारी गेले होते. त्यांना या दिवसात दारूची तहान भागवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असून काळाबाजार करणाऱ्यांच्या मागेसुद्धा फिरावे लागत असे. परंतु आता शासनाने दारुची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तळीरामांसाठी आनंदाचे दिवस आले असून अंजनगाव सुर्जी येथे आज दारू दुकाने उघडणार असल्याने येथील दुकाने उघडण्याआधीच सकाळपासून लांबलचक रांग लागली होती. तसेच शासनाने दारू दुकानदारांना घातलेल्या अटीनुसार येथील दारू दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवले आहे. कालपासूनच दुकानासमोर लाकडी कडगळे उभारले आहेत. ४० - ४५ दिवसांनंतर आज बऱ्याच दारू शौकीनांची दारू पिण्याची इच्छा पूर्ण होत असल्याने तळीरामांमध्ये अतिउत्साह दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details