अमरावती - जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील खडका जामगाव जवळील महादेव नगर लगत नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नेहमी पाणी पूल ओलांडत असते. यामुळे नागरिकांना नेहमीच त्रास होत असून ग्रामपंचायतीकडे तक्रार करुनदेखील त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण त्रस्त झाले आहेत.
वरूड तालुक्यातील खडका जामगाव येथील नागरिक पूरामुळे त्रस्त.. - नागरिक पूरामुळे त्रस्त
खडका गावादरम्यान महादेव नगर लगत असलेल्या नदी वरील पुलाची उंची दोन्ही बाजूला खूपच कमी आहे. यामुळे पावसाळ्यात गावात नेहमीच पूर येतो. या पूरामुळे नागरिकांना गावात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे.
वरूड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खडका जामगाव येथील नागरिक पुरामुळे पुरते हैराण झाले आहेत. खडका गावादरम्यान महादेव नगर लगत असलेल्या नदीवरील पुलाची उंची दोन्ही बाजूला खूपच कमी आहे. यामुळे पावसाळ्यात गावात नेहमीच पूर येतो. या पूरामुळे नागरिकांना गावात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे. या नदीचे खोरे खूपच कमी आहे. परंतु पूर आला तर दोन-दोन तास उतरत नाही. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
तक्रार करुनही यावर ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही, असा आरोप ग्रामस्थ यांनी केला आहे. नदीला नेहमी पूर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाताना त्रास होतो. गावातील लोकांना या पुलामुळे कित्येक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. तर, या गोष्टीची कोठेही दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण पुरते त्रासले आहेत.