अमरावती -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सलग २ दिवस ( शनिवारी व रविवार) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना आता तुम्ही याबाबत निर्णय घ्या, जनता कर्फ्यू तुम्ही पाळा असे सांगितले होते. या त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामीण भागाने चांगला प्रतिसाद जिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू - Amravati latest news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सलग २ दिवस ( शनिवारी व रविवार) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु
नागरिकांनी, दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळला. सर्व ठिकाणची दुकाने बंद ठेवले होती. लोकांची वर्दळीही नव्हती. केवळ मेडिकल व रुग्णालये चालू होती. शहरी भागात सर्वाधिक 140 कोरोना रुग्ण आहेत. मात्र, हा प्रतिसाद ग्रामीण भागातील लोकांनी दिला आहे. सर्वच ठाकाणच्या लोकांनी बाहेर न निघत व व्यापारी वर्गांनी आपली दुकाने बंद ठेवत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन केले.