अमरावती - प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे जल प्रदूषण होते, याची जाणीव हळुहळू सर्वांना होत आहे. हे टाळण्यासाठी अमरावती शहरातील नागरिकांनी मातीच्या गणपती मूर्तींना पसंती दिली आहे.
गणेश उत्सव हा उद्यापासून राज्यभरात सुरू होत आहे. मात्र, अमरावतीतील बहुसंख्य नागरिकांनी मातीच्या गणपती बाप्पाला आजच आपल्या घरी नेले आहे.
दरम्यान, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतीच्या दुकानात ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नदी नाल्यात, तलावांत फार पाणीसाठा नाही.