अमरावती- मोदी सरकार- २ चे पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. यामध्ये त्यांनी उत्पादन आयात शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती.
पेट्रोल-डिझलचे दर वाढले; सरकार विरोधात नागरिकांमध्ये रोष - Amravati
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे आजपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे. या वाढत्या दरांमुळे शहरी भागासह ग्रामीण भागात नागरिकांकडून सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
पेट्रोल, डिझल दर वाढीवर प्रतिक्रिया देताना नागरिक
त्याप्रमाणे आजपासून पेट्रोल २.४५ पैशांनी तर डिझल २.३६ पैशांनी महागले आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात २ रुपये ५० पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरांमुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या पेट्रोल डिझेल वाढीवर अमरावती जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना काय वाटत ? या बद्दल आढावा घेतला आहे अमरावतीतील आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...
Last Updated : Jul 6, 2019, 3:34 PM IST