शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचा पवारांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा- डॉ अनिल बोंडे - rain in amravati
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ अनिल बोंडें
अमरावती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. या पार्श्वभूमीवर, आता पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशी मिळेल. यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, असे मत किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.