अमरावती -यापूर्वी तुम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूरच्या सरपंच, आमदार, खासदार, राक्षस या जेवणाच्या थाळ्यांची नावे एकलीच असतील. पण, आज आम्ही तुम्हाला दोन अशा राजकारणातील पॉवरफुल नेत्यांच्या नावाने तयार पोटभर जेवणाच्या थाळ्या दाखवणार आहोत. त्या थाळ्या पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आता ही थाळी मुंबई, पुण्यात नाही तर चक्क विदर्भातील अमरावती शहरात आहे. नेमकी ही थाळी आहे तरी कशी आणि कुणाच्या नावाने आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊया अमरावतीच्या हिरेटेज किचन या हॉटेलमध्ये.
अमरावतीकरांना पवार (नॉनव्हेज), फडणवीस (व्हेज) थाळीचा लागलाय नाद.. - फडणवीस व्हेज थाळी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही दोन्ही नावे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम पॉवरफुल. या दोन नावांची आता अमरावतीत वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगू लागली आहे. या दोघांच्या नावाच्या जेवणाच्या थाळ्या सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा -गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर भाजपचे आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी
पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर अमरावतीमध्ये सुरू झालेल्या या थाळीच्या उपक्रमाला खवय्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही पॉवरफुल थाळ्यांमध्ये पोटभर जेवण मिळत असल्याचे समाधान ग्राहकांनी व्यक्त केले. जसा कोल्हापूरचा झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा असतो. तसाच विदर्भाचे वऱ्हाडी जेवण हीच बाब या हॉटेल मालकांनी हेरली आणि त्यातून हा उपक्रम सुरू झाला. आता अनलॉक प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यामुळे तुमचा बाहेर जाऊन खुमखीत जेवायचं बेत असेल. त्यात वऱ्हाडी जेवनासाठी जीभ आग्रह करत असेल जर तर मग पवार फडवणीच्या थाळीला एकदा चाखून पाहायला हरकत नाही.