अमरावती - विदर्भात आता म्यूकरमायकोसिसचे देखील रुग्ण आढळत असल्याने आता कोरोना नंतर हे दुसरे संकट आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी चंद्रपूर जिल्हात हे रुग्ण आढळले होते, तर अमरावतीतही म्यूकरमायकोसिस हा आजार असल्याने आरोग्य यंत्रनेमध्ये खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात दहा रुग्ण म्यूकरमायकोसिसचे असून ते जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली आहे. वैद्यकीय सूत्रांनुसार हा बुरशीपासून होणारा दुर्मीळ पण अत्यंत घातक संसर्ग असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा आजार आता उद्रेक करण्याची शक्यता आहे. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना हा आजार होतो असल्याचे बोलले जात आहे.
अमरावतीत म्यूकरमायकोसिसचा शिरकाव - अमरावती कोरोना अपडेट
अमरावतीत म्यूकरमायकोसिसचा शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा आजार आता उद्रेक करण्याची शक्यता आहे.
अमरावतीत म्यूकरमायकोसिसचा शीरकाव
आधीच कोरोनामुळे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला आहे. अमरावती बरोबरच इतर जिल्ह्यातीलही रुग्ण उपचार घेण्यासाठी अमरावतीमध्ये येत आहेत. त्यातच आता या आजाराने शिरकाव केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.