अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परसापूर येथील कोरोनाबाधीत 42 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रासह परसापूर उपकेंद्राचे पथक परसापूर येथे तळ ठोकून आहे. 674 कुटुंब संख्या असलेल्या 2 हजार 975 नागरिकांची प्रत्यक्ष गृहभेट देऊन तपासणी करण्यात आली. यापैकी फक्त 4 व्यक्तींनाच सर्दी, खोकला असल्याचे जाणवले.
अमरावतीतील परसापूर गाव सील, जवळपास ३ हजार नागरिकांची तपासणी - parsapur amravati corona patient
कंटेनमेंट परिसराला लागून असलेल्या सोमठाणा, ठोकबर्डा, उपातखेडा, जांभळा, खतिजापूर, वडगाव, हरम, आरेगाव, खांजमानगर, टवलार या गावातील प्रत्येक घराचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबत 108 ची रुग्णवाहिकाही सुसज्ज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण केले.
कंटेनमेंट परिसराला लागून असलेल्या सोमठाणा, ठोकबर्डा, उपातखेडा, जांभळा, खतिजापूर, वडगाव, हरम, आरेगाव, खांजमानगर, टवलार या गावातील प्रत्येक घराचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबत 108 ची रुग्णवाहिकाही सुसज्ज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. आजपर्यंत निकटच्या संपर्कात आलेल्या एकूण ३४ जणांना अमरावती येथील कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले, तर ३५ जणांना होमक्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संपूर्ण गाव सील करण्यात आले.
दरम्यान, परसापूर गाव अकोला ते बैतुल महामार्गावर असून कोरोनाबाधित परिसरही या मार्गाला लागून असल्याने बरेच वाहनधारक टवलार बायपासवरून ये-जा करीत आहेत. आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्के, डॉ. स्वाती टेकाडे, डॉ. शीतल ईंगोले, डॉ. नगमा पठाण, आरोग्य निरीक्षक गोपाल भुरके, गौरखेडे, आरोग्य सेवक निलेश दुर्बुडे, अभिलाष धोटे, आ. सेविका भटकर, बदुकले, आदी आपली सेवा देत आहेत.