महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Paratwada Murder Case: शेतमजूर महिलेवर 'त्याची' वाईट नजर; शेतमजूर दाम्पत्याने 'त्याला' कायमचचं संपविलं

Paratwada Murder Case, शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिलेवर वाईट नजर टाकणाऱ्या रखवलदाराची शेतमजूर दाम्पत्याने हत्या (Killing of farm guard) केली. (evil eye on woman farm laborer) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवगाव येथील शेतशिवारात शनिवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून अटक केली.

Paratwada Murder Case
परतवाडा हत्याकांड

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 9:53 PM IST

अमरावतीParatwada Murder Case:राजू नारायण येयणे (५२, रा. देवगाव) असं मृतकाचं नाव आहे. तर दिलीप उर्फ दीपक गुलाब पटेल (३९, रा. सावंगी, औरंगाबाद) व कपुरा जयराम उईके (४०, रा. केशरपूर, चिखलदरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. (farm laborer couple arrested)


असे आहे प्रकरण:राजू येयणे हा देवगाव शिवारातील एका शेतात रखवालदार म्हणून काम करीत होता. या शेतात काही दिवसांपूर्वीच दिलीप पटेल व कपुरा उईके हे दोघे शेतमजूर म्हणून कामाला आले होते. तिघेही शेतातच वास्तव्यास होते. दरम्यान, राजू येयणे याची कपुरा उईके हिच्यावर वाईट नजर होती. ही बाब दिलीप पटेल याच्या लक्षात आली. या कारणावरून शनिवारी रात्री दिलीप पटेल व राजू येयणे यांच्यात वाद झाला. या वादात दिलीप पटेल व कपुरा उईके या दोघांनी राजू येयणे याची हत्या केली. त्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. ही बाब शेतमालकाच्या लक्षात आल्यावर तातडीने घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी गजानन महादेव येवले (रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


मूर्तिजापूर येथील शेतात होते आरोपी लपून:स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात दिलीप पटेल व कपुरा उईके हे दोघे मूर्तिजापूर येथे पळून गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथक मूर्तिजापूरला रवाना झाले. पथकाने मूर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकामागील शेतातील एका झोपडीत लपून बसलेल्या दिलीप पटेल व कपुरा उईके यांना ताब्यात घेऊन अमरावतीत आणले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राजू येयणे याची कपुरा उईके हिच्यावर वाईट नजर होती. या कारणावरून दिलीप पटेल व राजू येयणे यांच्यात वाद झाला. या वादात दिलीप पटेल व कपुरा उईके या दोघांनी राजू येयणे याची हत्या केली, असे चौकशीत समोर आलं. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी परतवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, अंजली आरके, मंगेश मानमोडे, सागर धापड यांनी केली.

हेही वाचा:

  1. Mira Road Murder : पुतण्याकडून काकीची निर्घृण हत्या; एका तासात आरोपीला अटक
  2. Nagpur Murder Case : नागपूर हादरलं; १२ तासात दोन हत्या, पती पत्नीच्या नात्यातील संशय ठरला कारणीभूत
  3. Honor Killing in Mumbai : मुंबईत ऑनर किलिंग; आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं वडील, भावानं तरुणीसह युपीच्या प्रेमवीराला संपवलं!

ABOUT THE AUTHOR

...view details