अमरावती - विदर्भातील काश्मीर म्हणून ओळख असलेल्या मेळघाटात श्रावण महिन्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील पाच दिवसांपासून मेळघाटात सातपुडा पर्वत रांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्याचे सौंदर्य आणखीच बहरले आहे. यामुळे भर दिवसाही रस्त्यावर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
विदर्भातील नंदनवन 'मेळघाटा'चे सौंदर्य पावसामुळे आणखीनच बहरले - melghat's beauty
मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मेळघाटाचा परिसर हा आणखी फुलून गेला आहे. हिरवाईने नटलेल्या या मेळघाटात लहान मोठे शेकडो धबधबे सध्या प्रवाहित झाले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्याने यंदा मात्र मेळघाटाच्या पर्यटनाच्या आनंदापासून पर्यटकांना मुकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मेळघाटाचा परिसर हा आणखी फुलून गेला आहे. हिरवाईने नटलेल्या या मेळघाटात लहान मोठे शेकडो धबधबे सध्या प्रवाहित झाले आहेत. सातपुडा पर्वत रांगेतून शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे हे दरवर्षी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो. मात्र, यावेळी हे धबधबे पर्यटकांविना ओस पडले आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते धारणी या घनदाट जंगलातून गेलेले नागमोडी वळनाचे रस्तेसुद्धा फुलून गेले आहेत. भर दिवसा रस्त्यांवर धुके असल्याने गाडीचा हेडलाईट लाऊन वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.