अमरावती : वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आयोध्या येथून शंकरान उचल श्री नारायण गुरु महाराज हे 1911 मध्ये गुरु परमहंस श्रीमत शंकर महाराज यांच्या शोधात अमरावतीला आले होते. अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात नागनाथ बुवा गोसावी यांच्या मठात ते राहायचे.आपले गुरु परमहंस श्रीमत शंकर महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी 1924 पासून आषाढी एकादशी निमीत्त अमरावती शहरालगत असणाऱ्या धांडे माऊली येथून पंढरपूरपर्यंत पायी वारीला सुरुवात केली. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी पंढरपूर पर्यंत पायी जातात. परत देखील पाईप येतात. सुरुवातीला जुन्या शहरातील पाच-सहा जण वारीला जायचे मात्र, हळूहळू वारकऱ्यांची संख्याही 400, 500 पर्यंत वाढली. सध्या मात्र, शंभर ते दीडशे जण या वारीत सहभागी होत, असल्याची माहिती मठाचे विश्वस्त श्रीरंग हिर्लेकर यांनी 'ईटीव्ही भारत"शीबोलताना दिली.
पालखीचा 27 ठिकाणी मुक्काम :दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात एकादशीच्या तीन दिवसांपूर्वी माऊली धांडे या गावातून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी पंढरपूरच्या वारीला निघतात. गणोजादेवी, परलाम येथून ही वारी अमरावतीला एकादवशीच्या दिवशी पोहोचते द्वादशीला अमरावतीतून ही पालखी पुढे बडनेरा, बो,पी धनज, कारंजा मंगरूळनाथ, विठोरा, वाशिम ,कन्हेरगाव, हिंगोली, औंढानागनाथ, जवळा बाजार, परभणी, पोखणी गंगाखेड परळी वैजनाथ, आंबेजोगाई सादळेश्वर, पैठण, कळम, शेरमाळा, भगवान बार्शी , कुर्डूवाडी, शेटफळ येथून थेट पंढरपूरला पोहोचते. 27 दिवसांचा हा प्रवास असतो. आषाढी एकादशी झाल्यावर चौथ्या दिवशी पुन्हा या वारीचा परतीचा प्रवास सुरू होतो. ही वारी पंढरपूर वरून 23 दिवसात पायी चालत परत येते. मठाच्या वतीने कधीही कोणाकडून पैसे मागितले जात नाही. जे कोणी काही दान देतं ते थेट दानपेटीत येतं.