अमरावती - जिल्ह्यातील ३ पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आज (सोमवार) तिवसा, धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर काँग्रेस तर चांदुर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
सोमवारी तीनही पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ६ पैकी सहाही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे नेते आमदार अरुण अडसुळ यांचा बालेकिल्ला असलेल्या धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर मात्र, काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. येथील ८ पैकी ६ जागा काँग्रेसने निवडून आणल्या तर, भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. चांदुर रेल्वे पंचायत समितीमध्ये ६ पैकी ४ जागांवर भाजपने विजय मिळवला असून २ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.