अमरावती- जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यातील आठ पंचायत समितीवर महिला राज येणार आहे. आज जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या पंचायत समितींसाठी मतदान होणार असून सोमवारी मतमोजणी पार पडेल.
अमरावतीच्या १४ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, ३ पंचायत समितीसाठी आज मतदान - पंचायत समिती निवडणूका
जिल्हाधिकारी कार्यालयात १४ तालुक्यातील पंचायत समितीची आरक्षण सोडत पार पडली. यातील आठ पंचायत समितीवर महिला राज येणार आहे.आज जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या पंचायत समितींसाठी मतदान होणार असून सोमवारी मतमोजणी पार पडेल.

एकीकडे राज्यातील सत्तेच्या महानाट्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची राज्यात महाविकासआघाडी झाली असली, तरी या तिन्ही पंचायत समितीच्या निवडणूक मात्र प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र लढवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १४ तालुक्यातील पंचायत समितीची आरक्षण सोडत पार पडली.
यामध्ये दर्यापूर अनुसूचित जाती, वरुड अनुसूचित महिला, भातकुली अनुसूचित जाती महिला, अंजनगाव सुर्जी अनुसूचित जमाती महिला, मोर्शी इतर मागासवर्गीय, चांदुर रेल्वे इतर मागासवर्गीय, नांदगांव खन्देस्वर इतर मागासवर्गीय महिला, अचलपूर इतर मागासवर्गीय महिला, धामणगाव रेल्वे सर्वसाधारण ,चांदुर बाजार सर्वसाधारण, अमरावती सर्वसाधारण महिला,तिवसा सर्वसाधारण महिला, चिखलदरा अनुसूचित जमाती, धारनी अनुसूचित जमाती महिला, अशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.