अमरावती : धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शंकरपटावर न्यायालयाने बंदी ( ( Shankarpat Ban ) ) घातल्यामुळे शंकरपट बंद करण्यात आला होता. पुढे दोन वर्ष कोरोना असल्याने हा शंकरपट भरलाच नाही. परंतु आजी-माजी आमदारांच्या पथक प्रयत्नातून पुन्हा एकदा शंकर पट भरवल्या जाणार असून सर्जा राजाची जोडी पुन्हा धावणार ( Sarja Raja will run again ) आहे. शंकरपटाला आहे दीडशे वर्षाची परंपरा मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी तळेगाव दशासर येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात येत होते. परंतु या शंकरपटावर तब्बल ९ वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती.
Shankarpat : तब्बल ९ वर्षानंतर तळेगांवच्या शंकर पटात सर्जा राजाची जोडी पुन्हा धावणार - MLA Pratap Adsad
धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शंकरपट ( Shankarpat in Talegaon Dashasara ) पुन्हा सुरु होणार आहे. मकर संक्रांतीच्या ( Makar Sankranti ) शुभमुहूर्तावर दरवर्षी तळेगाव दशासर येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात येते. परंतु या शंकरपटावर तब्बल ९ वर्षांपूर्वी न्यायालयाने बंदी ( Shankarpat Ban ) घातली होती.
शंकरपटावर बंदी उठवली - धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे शंकर पटासाठी प्रसिध्द आहे. येथील शंकर पटाला मोठा इतिहास आहे. हा शंकरपट विदर्भात प्रसिध्द आहे. परंतु ९ वर्षांपूर्वी या शंकरपटावर न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हा शंकर पट बंद करण्यात आला होता. परंतु परंपरा असलेला हा शंकरपट पुन्हा एकदा सुरू करावा यासाठी विद्यमान आमदार प्रताप अडसड ( MLA Pratap Adsad ) यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांची भेट घेऊन शंकरपट पुन्हा एकदा सुरू करावा अशी मागणी केली. विखे पाटील यांनी आ. अडसड यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना शंकर पट सुरू करण्यात यावा असे पत्र दिल्याची माहिती आहे.
आजी -माजी आमदारांच्या प्रयत्नाला फळ -विद्यमान आमदार प्रताप अडसड तसेच माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी शंकर पट सुरू व्हावा यासाठी सागर त्यांनी पुढाकार घेतला होता शंकर पटावरील बंदी हटवले नाही कृषक सुधार मंडळाच्या वतीने आजी माजी आमदाराचा नुकताच सत्कार करण्यात आला. शंकर पट ज्या ठिकाणी भरणार आहे त्या जागेची आमदाराच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे.