अमरावती -कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाला मात देण्यासाठी अमरावती शहरातील इर्विन जिल्हा सामान्य रुग्णालयात चीनच्या हर्मन्स केमो मैफ कंपनीचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या जागेची आज बडनेरचे आमदार रवी राणा यांनी पाहणी केली.
चीनमधून आयात केला आहे ऑक्सिजन प्रकल्प -
खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नामुळे आणि हर्मन्स केमो मैफ कंपनीच्या सीएसआर फंडमधून देण्यात आलेल्या निधीतून हा ऑक्सिजन प्रकल्प अमरावतीत उभारला जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प चीनमधून भारतात येण्यासाठी निघाला असून 10 जूनला हे सर्व साहित्य अमरावतीत पोचणार आहे. तसेच 20 जूनपर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. या प्रकल्पाद्वारे रोज 240 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मदत -