महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा : कोण जिंकणार अमरावती?

अमरावतीमध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.  तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला आहे.

By

Published : Oct 23, 2019, 3:59 PM IST

Updated : Oct 23, 2019, 4:14 PM IST

कोण जिंकणार अमरावती ?

अमरावती- अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी, धामणगाव यांचा समावेश आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला आहे. अमरावतीमधील 6 जागा या भाजपकडे आहेत. तर २ जागा काँग्रेस आणि २ जागेवर अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत कोणते उमेदवार बाजी मारणार कोण बाजी मारणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • अमरावती विधानसभा मतदारसंघ -

या मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख आहेत. 2014 मध्ये देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा 48,961 मतांनी पराभव झाला होता. यंदा अमरावती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपने सुनिल देशमुख यांना तिकिट दिले असून त्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुलभा खोडके यांना रिंगणात उतरवले आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. भाजप - सुनील देशमुख - 84 हजार 033
  2. काँग्रेस - रावसाहेब शेखावत - 48 हजार 961
  3. बसपा - अख्तर मिर्झा नईम बेग - 11 हजार 585
  4. शिवसेना - प्रदीप बाजड - 8 हजार 256
  • तिवसा विधानसभा मतदारसंघ -

या मतदारसंघामध्ये अॅड. यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. तर 2014 मध्ये भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा 38 हजार 367 मतांनी ठाकूर यांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीसाठी तिवसा मतदारसंघातून पुन्हा एकदा यशोमती ठाकूर यांना काँग्रेसने तिकिट दिले आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. काँग्रेस - अॅड. यशोमती ठाकूर - 58 हजार 808
  2. भाजप - निवेदिता चौधरी - 38 हजार 367
  3. शिवसेना - दिनेश वानखेडे - 28 हजार 671
  4. बसपा - संजय लव्हाळे - 11 हजार 354
  • दर्यापूर विधानसभा मतदारसंघ -

सध्या येथे भाजपचे रमेश बुंदिले विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये बुंदिले यांच्या विरोधात रिपाईच्या बळवंत वानखेडे यांचा 44,642 मतांनी पराभव झाला होता. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा भाजपने बुंदिले यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचे आव्हान असणार आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. भाजप - रमेश बुंदिले - 64 हजार 224
  2. रिपाइं - बलवंत वानखडे - 44 हजार 642
  3. शिवसेना - कॅप्टन अभिजीत अडसूळ - 32 हजार 256
  4. राष्ट्रवादी काँग्रेस - दिनेश बूब - 14 हजार 671
  • बडनेरा विधानसभा मतदारसंघ -

2014 च्या विधानसभा निवडणूकीत येथून रवी राणा यांचा विजय झाला होता. तर राणा यांच्या विरोधात सुलभा खोडके यांचा 33,897 मतांनी पराभव झाला होता. मात्र, यंदा रवी राणा यांच्यासमोर संजय बंड यांच्या पत्नी सेना-भाजप उमेदवार प्रीती बंड यांचे आव्हान असणार आहे.

  • विधानसभा निवडणूक 2014 निकाल
  1. रवी गंगाधर राणा, अपक्ष - 46827
  2. संजय बंड, शिवसेना - 39408
  3. श्रीमती सुलभा खोडके, काँग्रेस - 33897
  4. तुषार भारतीय, भाजप - –31455
  5. रवी वैद्य, बहुजन समाज पक्ष - 12663
  • मोर्शी विधासभा मतदारसंघ -

अमरावती जिल्ह्यामधील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे. भाजपचे डॉ. अनिल बोंडे हे मोर्शीचे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये बोंडे यांनी राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुखांचा 31 हजार 449 या मतांनी पराभव केला होता. तर यंदा विधासभा निवडणुकीसाठी मोर्शी मतदारसंघातून अनिल बोंडे यांच्या विरोधात वंजित बहुजन आघाडीच्या नंदकिशोर कूयटे यांचे आव्हान असणार आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. भाजप - डॉ. अनिल बोंडे - 71 हजार 611
  2. राष्ट्रवादी काँग्रेस - हर्षवर्धन देशमुख - 31 हजार 449
  3. काँग्रेस - नरेशचंद्र ठाकरे पाटील - 30 हजार 207
  4. शिवसेना - उमेश यावलकर - 27 हजार 122
  • धामणगांव रेल्वे विधानसभा मतदासंघ -

धामणगाव रेल्वे मतदारसंघाला चांदुर रेल्वे मतदरासंघ म्हणून सुद्धा ओळखले जाते. सध्या काँग्रेसचे विरेंद्र जगताप हे येथील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या अरुण अडसड यांचा 69 हजार 905 मतांनी पराभव केला होता. तर यंदा धामणगांव येथून विरेंद्र जगताप यांच्या विरोधात भाजपकडून प्रताप अडसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. काँग्रेस - विरेंद्र जगताप - 70 हजार 879
  2. भाजप - अरुण अडसड - 69 हजार 905
  3. बसप - अभिजीत ढेपे - 29 हजार 229
  4. शिवसेना - सिद्धेश्वर चव्हाण - 14 हजार 161
  • अचलपूर विधानसभा मतदारसंघ -

बच्चू कडू हे या मतदरासंघातील विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये बच्चू कडू यांनी भाजपच्या अशोक बनसोड यांचा पराभव केला होता. तर यंदा शिवसेनेकडून सुनीता फिसके तर काँग्रेसने अनिरुद्ध देशमुख यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

  • 2014 ची परिस्थिती -
  1. अपक्ष - बच्चू कडू - 59 हजार 234
  2. भाजप - अशोक बनसोड - 49 हजार 064
  3. काँग्रेस - अनिरुद्ध देशमुख - 26 हजार 490
  4. बसप - मो. रफिक शेख - 20 हजार 602
  • मेळघाट विधानसभा मतदारसंघ -

मेळघाट मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. मात्र, 2014 ला येथे भाजपचे आमदार प्रभुदास भिलावेकर निवडून आले. भिलावेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल हे रिंगणात होते. त्यांचा 55 हजार 25 मतांनी पराभव झाला होता. तर यंदा विधानसभा निवडणुकीत मेळघाटमधून भाजपच्या रमेश मावस्कर तर राष्ट्रवादी पक्षाकडून केवळराम काळे यांना तिकिट देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल -

  1. प्रभुदास बाबुलाल भिलावेकर - भाजप - 57002
  2. राजकुमार पटेल - राष्ट्रवादी - 55023
  3. केवलराम काळे - काँग्रेस - 48529
  4. किसन जामकर - बहुजन समाज पक्ष - 4604
  5. मोतीलाल कसदेकर - शिवसेना - 4333
Last Updated : Oct 23, 2019, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details