महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Folk Dance Competition : कामगार कल्याण मंडळाच्या मंचावर थिरकणार राज्यातील तरुणाई, 27 व्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन - 18 लोकनृत्य कलावंताचे संघ सहभागी होणार

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (labour welfare department) अमरावती च्या वतीने उद्या 29 डिसेंबर रोजी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 27 व्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन (State Level Folk Dance Competition) करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत नृत्य कला आविष्कार सादर करण्यासाठी संपुर्ण राज्यातून नामवंत असे 18 लोकनृत्य कलावंताचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेनिमित्य नृत्य कलावंताची मांदियाळी अंबानगरीत अवतारणार आहे. या अभिनव अशा लोकनृत्य स्पर्धेचा आनंद नृत्य रसीकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थीती देऊन घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये केले.

Folk Dance Competition
राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन

By

Published : Dec 28, 2022, 7:22 PM IST

प्रतिक्रिया देतांना वैशाली नवघरे

अमरावती : विदर्भ हे कला-संस्कृतीचे माहेरघर आहे. याच कालाकरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ' (labour welfare department) अमरावती च्या वतीने उद्या 29 डिसेंबर रोजी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे, 27 व्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन (State Level Folk Dance Competition) करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत नृत्य कला आविष्कार सादर करण्यासाठी संपुर्ण राज्यातून नामवंत असे 18 लोकनृत्य कलावंताचे संघ सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित : गेल्या 27 वर्षापासून अविरतपणे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी या लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी लोकनृत्यरसिकांच्या मनातील मोरपिसारा फुलविण्यासाठी आणि आजच्या युवा मिठीतील नृत्य कलावंताच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 29 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे केले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सांयकाळी होणार आहे.


अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार :पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. अनिल बोडे, सदस्य राज्यसभा तर मुख्य अतिथी म्हणून राज्याचे कामगार मंत्री मा.डॉ. सुरेश खाडे, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नवनीत राणा, आमदार प्रविण पोटे पाटिल , आमदार सुलभा खोहके , आमदार रवि राणा, किरण पातुरकर अध्यक्ष, एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीयल असोसिएशन, तर विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे मान्यवर उपस्थिती होणार आहेत.


225 नृत्य कलावंत : या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत एकूण 18 लोकनृत्य संघ सहभागी होणार आहेत. या माध्यमातून 225 नृत्य कलावंत आपला कला आविष्कार सादर करणार आहेत. या युवा नृत्य कलावंताचा उत्साह व्दिगुणीत करण्यासाठी अमरावती नगरीतील नृत्य रसिकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवावी, अशी माहिती वैशाली नवघरे, प्र.सहायक कल्याण आयुक्त, अकोला यांनी पत्रकार परिषदे द्वारा दिलेली आहे. पत्र परिषदेला सचिन खारोडे, प्रतिभा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details