महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे आदेश - st corporation news amravati

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. एसटीच्या विभागीय कार्यशाळेचा प्रवासी वाहतुकीशी थेट संबंध येतो.

st stand
बस स्थानक

By

Published : Mar 23, 2021, 3:06 PM IST

Updated : Mar 23, 2021, 3:45 PM IST

अमरावती - वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक परिवहन (एसटी) महामंडळानेही चालक-वाहक व यांत्रिकी कर्मचारी वगळून प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश एसटीच्या विभाग नियंत्रकांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाचा निर्णय.

हेही वाचा -'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेबाबत परिपूर्ण नियोजन सादर करा; यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश

कर्मचाऱ्यांना आळीपाळीने बोलवा -

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. एसटीच्या विभागीय कार्यशाळेचा प्रवासी वाहतुकीशी थेट संबंध येतो. त्यामुळे चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी तसेच सर्व अधिकारी व पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना बघून प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के ठेवण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. तातडीची व महत्त्वाचे काम सुरू राहील, यासाठी संबंधित खाते विभाग गटप्रमुख यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी अधिकारी व पर्यवेक्षक पदावर कर्मचाऱ्यांना वगळून प्रशासकीय व कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात न बोलावता त्यांना आळीपाळीने बोलवावे. त्यानुसार कामाची नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर गहू उध्वस्त

31 मार्च पर्यंत नियम लागू -

कार्यालयीन कर्मचाऱ्यांना एकूण कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती राहील, याची दक्षता घ्यावी, असे पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, 31 मार्च पर्यंत हे नियम लागू असणार आहे.

Last Updated : Mar 23, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details