अमरावती-जिल्ह्यात आज (दि. 20 मार्च) तिसऱ्या दिवशीही चांदुर बाजार तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. यामुळे तालुक्यातील संत्र्याला आलेला अंबिया पूर्णता गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडाला आहे. यासोबतच काढणीला आलेला गहू, हरभरा,कांदा व इतर भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने 9 तालुक्यातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सायंकाळी जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव, शीरसगाव तसेच मोर्शी तालुक्यात पुन्हा गारपीट झाली. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.