अमरावती -अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज देण्यात आले आहे. तर सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. कामगार, मध्यम वर्गाच्या हिताचे यात काहीचं नाही, असा घणाघात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
केंद्र सरकारचे बजेट म्हणजे नुसते स्वप्नं दाखवल्या सारख आहे. त्यांनी सांगितलं की हे डिजिटल बजेट आहे. या बजेटमध्ये कोरोनाची लस मोफत मिळेल, अशी घोषणा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती. तसेच मोदीजी यांनी दाखवलेले रोजगाराचे स्वप्नं पूर्ण होतील, अशी सुद्धा अपेक्षा होती, असे देखील मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.