अमरावती - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. यातून गरजू लोकांना आर्थिक मदत केली जाते. पण कक्ष बंद झाल्याने ही मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे हा कक्ष त्वरीत सुरू करण्यात यावा, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती शहर अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केली आहे. यासंबंधीचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.
अभिजीत देशमुख यांची प्रतिक्रिया हेही वाचा -शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या 'त्या' महिला उपविभागीय अधिकाऱ्यानी मागितली माफी
अमरावती जिल्ह्यात या निधीचा सर्वाधिक लाभ रुग्णांना मिळाला आहे. मात्र, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्यामुळे उपचारासाठी दाखल झालेले तसेच दाखल होणाऱ्या रुग्णांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा -अमरावती - ओम कॉलनीत स्वच्छतेचे तीन-तेरा
दरम्यान, राष्ट्रपती राजवटीमुळे राज्याची संपूर्ण जबाबदारी राज्यपाल म्हणून आपल्याकडे आली आहे. राज्यपालांनी गरीब रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन रुग्णांना तातडीने मदत सुरू करावी, अशी मागणी अभिजीत देशमुख यांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करताना अभिजित देशमुख यांच्यासोबत धनंजय लोणारे, गिरीधर तिवारी, शेख जाफर, सूरज कवाडे, अनुप खडसे, अमर काळमेघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.