अमरावती -एका जमावाने मोर्चा काढून शुक्रवारी शहरातील काही भागात दगडफेक केली, याची प्रतिक्रिया म्हणून दुसऱ्या समुदायाच्या जमावाने शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केल्यानंतर तणाव निर्माण झाला. काही वेळातच दगडफेक आणि जाळपोळ मीच या घटनेमुळे अमरावती शहर प्रशांत झाले. शहरातील परिस्थिती आटोक्यात यावी कुठल्याही अफवा पसरू नये या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी शहरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. (Amravati Violence)
इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे (Amravati Internet Connectivity) शहरातील तणाव कमी करण्यास मदत झाली असताना कोरोना काळापासून ऑनलाईन अभ्यास करणारे अभियांत्रिकीसह विविध शाखेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच पुणे आणि मुंबई येथील आयटी क्षेत्रात काम करणारे सॉफ्टवेअर अभियंते अमरावती वर्क फॉर्म होम करणाऱ्यांची कामे मात्र बंद झाली आहेत. आता आपला अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना समोर उभा ठाकला असताना आपल्या जॉबवर संकट तर येणार नाही, अशी भीती सॉफ्टवेअर अभियंत्यांना भेडसावत आहे.
सॉफ्टवेअर अभियंत्यांना जॉब संकटात येण्याची भीती -
कोरोना काळापासून पुणे, मुंबई, बंगळुरू याठिकाणी आयटी क्षेत्रात काम करणारे अमरावतीकर अभियंते अमरावतीत आपल्या घरुनच कंपनीची कामे करीत आहेत. शनिवारपासून मात्र इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे आमचे कामही बंद झाले आहे. कंपनीकडून आम्हाला विचारणा केली जात आहे. चार दिवसांपासून आमचा वर्क फॉर्म होम होत नसल्यामुळे आमचा जॉब अडचणीत येईल की काय? अशी भीती माझ्यासह अनेकांना भेडसावत असल्याचे पूजा लोखंडे या सॉफ्टवेअर अभियंता ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा - Amravati Violence : संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये - नवनीत राणा