अमरावती - ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून गावठी दारूची अवैध विक्री व तस्करी सुरू होती. याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन तपास करत होते. याआधी काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.
अमरावतीत एक हजार लिटर गावठी दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - अमरावती गावठी दारू जप्त
ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून गावठी दारूची अवैध विक्री व तस्करी सुरू होती. याबाबत उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन तपास करत होते. याआधी काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.
अशाच प्रकारे मध्यप्रदेश सीमेवरून वरुड येथे एका चारचाकीतून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्याआधारे आज सापळा रचून संबंधित चारचाकीला आडवण्यात आले. यावेळी चारचाकीतून दारू तस्करी होत असल्याचे समोर आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चारचाकीसह जवळपास एक हजार लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणात दीपक मोरे (वय 35) याला अटक करण्यात आली असून त्याचावर करवाई सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून अवैध दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊच्या शिथिलतेचा गैरफायदा उठवत तस्करांनी गाड्यांमार्फत दारूची वाहतूक सुरू केलीय. मात्र या कारवाईनंतर तस्करांचे धाबे दणाणले आहे.