अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यात शनिवारी ४ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. रमेश पांडुरंग बुंदीले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते निंभोरा बोडखा येथील रहिवासी आहे.
अमरावतीत उष्माघाताने एकाचा बळी - रमेश बुंदीले
अमरावतीच्या धामणगावात उष्णघाताने एका वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्यातील ही पहिली घटना आहे.
बुंदीले (५२) हे शनिवारी सायकलीने पुलगाव येथे काही कामानिमित्त गेले होते. त्यानंतर दुपारी गावाकडे परत येत असताना त्यांना झाडगाव येथे तहान लागली. ते एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेले. मात्र, तेथे त्यांना पाणी मिळाले नाही. त्यानंतर एका शेतात झाडाखाली बसले असताना त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शनिवारी धामणगाव तालुक्यात ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. या तापमानवाढीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बुंदेल यांच्यामागे १ मुलगा ४ मुली असा मोठा परिवार आहे. उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्यातील ही पहिली घटना आहे. बुंदेलेंचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याची माहिती येथील पोलीस पाटील विशाल बांते यांनी दिली.