अमरावती - शहरात उद्रेक घालणारा कोरोना आता ग्रामीण भागात पोहोचला असून मोर्शी तालुक्यातील नांदुरा पिंगळाई या गावातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती कामानिमित्त अमरावतीत राहत होता. त्यामुळे, अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या आता 20 झाली आहे.
अमरावती : नांदुरा पिंगळाईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांची संख्या 20 वर - corona positive latest update
अमरावती शहरात उद्रेक घालणारा कोरोना आता ग्रामीण भागात पोहोचला असून मोर्शी तालुक्यातील नांदुरा पिंगळाई या गावातील ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामीण भागातही याचा प्रसार हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाची लागण झालेली 55 वर्षीय व्यक्ती ही गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह अमरावती शहरातील पठाण चौक भागातील भातकुली मार्गावरील परिसरात वास्तव्यास आहे. तो काही कामानिमीत्त त्याच्या अमरावती शहरापासून जवळच असणाऱ्या आणि मोर्शी तालुक्यातील नांदुरा पिंगळाई या गावात आला होता. मात्र, त्याच्यात कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आली होती. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान अमरावतीत कोरोनाची लागण आता झपाट्याने वाढते आहे. कोरोनाने परिसराची व्यपतीही वाढवली असल्याने अमरावती शहर आणि जिल्ह्यासाठी आता धोका वाढला आहे.