महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील तीन मजली इमारत कोसळली - अमरावती जयस्तंभ चौक इमारत

गांधी मार्केट इमारतीचे बांधकाम 1960 मध्ये झाले आहे. या इमारतीत एकूण 12 दुकाने सुरू होती. बुधवारी मुसळधार पाऊस कोसळल्यावर रात्रभर रिमझिम पाऊस बरसत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास गांधी मार्केटची इमारत अचानक कोसळली.

r-building-collapse-in-amravati
अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील तीन मजली इमारत कोसळली

By

Published : Jul 16, 2020, 10:35 AM IST

Updated : Jul 16, 2020, 10:41 AM IST

अमरावती - शहरातील जयस्तंभ चौक परिसरात अमरावती रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर असणारी तीन मजली इमारत गुरुवारी पहाटे कोसळली. इमारतीच्या बाहेर असणारा सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्तीव्यवस्थापनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. गांधी मार्केट या नावाने ही इमारत ओळखली जात होती. मात्र, शहराच्या मध्यभागात असणारी इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २ दिवसापासून शहरात पाऊस सुरू असल्यानेही इमारत कोसळली.

जयस्तंभ चौकातील तीन मजली इमारत कोसळली
गांधी मार्केट इमारतीचे बांधकाम 1960 मध्ये झाले आहे. या इमारतीत एकूण 12 दुकाने सुरू होती. बुधवारी मुसळधार पाऊस कोसळल्यावर रात्रभर रिमझिम पाऊस बरसत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास गांधी मार्केटची इमारत अचानक कोसळली. या परिसरातच असणाऱ्या शहर कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तडकाफडकी घटनास्थळी पोहोचले. इमारत कोडल्याने जखमी झालेल्या चौकीदारस उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच महापालिकेचे अभियंते, अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक आणि शहर सुधार समिती समापती अजय सारसकर, नगरसेवक लवलीना हर्षे घटनास्थळी पोचले. लागतच्या इमारतीत असणाऱ्या काही लोकांना इमारतिबाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला इमारतीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. ही इमारत जीर्ण झाली होती का? या इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली होती का? हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया शहर सुधार समिती सभापती अजय सारसकर यांनी दिली. शहरातील जीर्ण इमारती किती आहेत. त्यांची अवस्था कशी आहे याची आता तडकाफडकी माहिती घेतली जाणार असल्याचेही सारसकर म्हणाले.

Last Updated : Jul 16, 2020, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details