अमरावती- धामणगाव रेल्वे शहरात उष्माघाताने एकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. राधेश्याम मरसकोल्हे असे मृताचे नाव आहे. आठ दिवसा अगोदरच या शहरात उष्माघाताचा बळी गेल्याने जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत उष्मघाताचा बळी, आठ दिवसांतील दुसरी घटना
धामणगाव रेल्वे शहरात उष्माघाताने एकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. राधेश्याम मरसकोल्हे असे मृताचे नाव आहे.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वेत उष्मघाताचा बळी
जिल्ह्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला असून तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. मागील ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला, विद्यार्थिनी स्कार्फ बांधून स्वतःची सुरक्षा करत आहेत. थोडासा थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आश्रय घेताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते ओस पडायला लागली आहेत.