महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती; रिद्धपूर येथे दुचाकी व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - अमरावती अपघात

या अपघातात अर्पित कविटकर (22) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेल्या राज खुळे (21) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अमरावतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

amravati accident
अमरावती अपघात

By

Published : Dec 2, 2019, 10:14 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील चांदूरबाजार रोडवरील रिद्धपूरजवळ दुचाकी व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. यात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात अर्पित कविटकर (22) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेल्या राज खुळे (21) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अमरावतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पथ्रोटवरून लग्न समारंभ आटोपून परत येत असलेल्या स्कॉर्पिओ ( MH40 KR 7645) या गाडीचा रिद्धपूर ते कोळविहिर दरम्यान पुढील टायर फुटला. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱया मोटरसायकलला ( MH27 CJ 9534) जबर धडक दिली. यात अर्पित कविटकर( रा. चांदूरबाजार) या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला राजु खुळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details