महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून - गुन्हे विषयक बातम्या

एका प्रकरणाची न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी असल्याने नानीका हसन आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन न्यायालयात जात होता. जाफर जीन परिसरात नानीकावर अज्ञात ३ ते ४ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नानीकाचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर रिक्षामधून आले होते.

अज्ञात टोळक्याकडून अट्टल गुन्हेगाराचा भरदिवसा खून

By

Published : Nov 25, 2019, 3:47 PM IST

अमरावती - शहरात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराची अज्ञातांनी हत्या केली. ही घटना शहरातील कॉटन मार्केट लगतच्या जाफर जीन परिसरात घडली. दरम्यान, या घटनेने अमरावती शहर हादरले आहे. शेख हसन शेख हुसेन उर्फ नानीका हसन (४७) असे मृताचे नाव आहे.

नानीका हसन हा एका प्रकरणाची तारीख असल्याने, आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन न्यायालयात जात होता. जाफर जीन परिसरात नानीकावर अज्ञात ३ ते ४ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नानीकाचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर रिक्षामधून आले होते.

घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे

शहर कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नानीका हसनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात नानीकाच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही काळ रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, नानीका हसन हा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध गुन्ह्यात २५ च्या वर खटले सुरू असल्याचे समजते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -तिच्या "प्रेमाने" व धैर्याने त्याच्या कायमस्वरूपी "अपंगत्वालाही" नाही मोजले; मोहिनी झाली दिव्यांग अक्षयचा आधार

हेही वाचा -पोहरा-मालखेड जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मिळाली 'दिशा'

हेही वाचा -सत्ता स्थापनेत सर्वोच्च न्यायालयाला पडण्याचा अधिकार नाही- बाळासाहेब आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details