अमरावती - फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जागतिक फोटो छायाचित्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गांधी चौकातून कॅमेरा दिंडी देखील काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत दलाल यांनी कॅमेऱ्याचे पूजन केले.
अमरावतीमध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त काढली कॅमेरा दिंडी - कॅमेरा दिंडी
अमरावतीमध्ये फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जागतिक फोटो छायाचित्र दिनानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी कॅमेरा दिंडी काढून या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
अमरावतीमध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त काढली कॅमेरा दिंडी
फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जागतिक फोटो छायाचित्र दिनानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी कॅमेरा दिंडी काढून पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी छायाचित्रकारांनी राजकमल चौक येथे ढोल ताशांच्या नादात जल्लोष साजरा केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनीष जगताप, वैभव दलाल, राजेश वाडेकर, राहुल आंबेकर, रुपेश फसाटे, संजय साहू आदी या दिंडीत सहभागी झाले होते.