अमरावती - विदर्भातील पंढरपूर म्हणजे रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी ७.३० वाजता महापूजा करण्यात आली. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरमध्ये रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - अमरावती
महाराष्ट्रातून पंढरपूरला पायदळ जाणाऱ्या वाऱ्यांपैकी कौंडण्यपूरवरून जाणारी वारी सर्वात आधी पोहोचते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक पायदळ वारीला जात असतात. पंढरपूरला ज्याप्रमाणे गर्दी असते त्याचप्रमाणे गर्दी कौंडण्यपूरला देखील असते.
यंदा पहिल्या पूजेचा मान आर्वी येथील सत्यनारायण चांडक यांना सपत्नीक मिळाला. तिवसा तहसील कार्यालयाचे तहसीलदार रवी महाले, नायब तहसीलदार दत्ता पंधरे, मंडळ अधिकारी नंदकिशोर मधापुरे यांनी सपत्नीक जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. या पूजेला मंदिर संस्थांचे पुजारी कर्मचारी तसेच ट्रस्टी, भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्रातून पंढरपूरला पायदळ जाणाऱ्या वाऱ्यांपैकी कौंडण्यपूरवरून जाणारी वारी सर्वात आधी पोहोचते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक पायदळ वारीला जात असतात. पंढरपूरला ज्याप्रमाणे गर्दी असते त्याचप्रमाणे गर्दी कौंडण्यपूरला देखील असते. आज सकाळी ६ वाजेपासून भाविकांच्या रांग्या लागल्या होत्या. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जवळपास ३० ते ४० हजार भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी कौंडण्यपूर भक्ती भावाने फुलून गेले असून दर्शन घेताना भाविक विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत होते. तसेच भाविक वर्धा नदीला पवित्र मानून आंघोळ करत आहेत तसेच नदीत नौकाविहारचा आनंद घेत आहेत. त्यामुळे भाविकांचे शांततेत दर्शन व्हावे याची देवस्थान समितीने विशेष काळजी घेतली होती. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीतिरावर देखील चोख सुरक्षा पाळण्यात आली आहे.