महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा - अमरावती अवकाळी पाऊस

अमरावती जिल्ह्याला गारपीटीने झोडपले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी आला आहे.

गारपीट
गारपीट

By

Published : Jan 2, 2020, 7:55 AM IST

अमरावती -जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गारपीट झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी आणि रब्बीमधील गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी, धारणी, तिवसा या तालुक्यांना पावसाचा फटका बसला.

अमरावती जिल्ह्यात गारपीट

हेही वाचा -अकोल्यात 3 मजली इमारत कोसळली


मंगळवारी झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी पुन्हा गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके सपाट झाली आहेत. काढणीला आलेल्या तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. हरभरा पिकाला पाणी जास्त होत असल्याने तेही धोक्यात आले आहे. हवामान विभागाने पाच जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणी आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details